निळाई

इंदू शिरगांवकर


नील आर्मस्टरॉंग व सहकाऱ्यांनी सांगितले कि पृथ्वी आकाशातून निळी दिसते...
नंतर असे कळले कि पृथ्वीचा ७० टक्के भाग पाण्याने व्यापलेला असलेने ती तेथून निळी दिसते..
याचाच अर्थ कि आकाश जर निळे दिसते तर त्यात सुद्धा ७० टक्के पाणी असणार...म्हणूनच पाऊस पडतो...
पण आमच्या नळातून पाणी येते तो तर गांजलेला दिसतो...
आई म्हणते पलीकडच्या काकूंच्या अंगात खूप पाणी आहे.. पण त्या निळ्या दिसत नाहीत, पण त्यांचे डोळे निळे आहेत...
पण त्यांच्या पिंकीचे डोळे निळे असूनहि तिला कोण तिच्या अंगात पाणी आहे म्हणत नाही..
परवा बाबा इस्त्री करताना मी इस्त्रीवर पाणी ओतले तेंव्हा त्या पाण्याने बाबासुद्धा निळे पडले होते...
.
.
यावरून मला हे पटले कि पाणी निळे नसते पण ते धारण केलेल्या गोष्टी निळ्या असतात...

Comments