Skip to main content

Posts

Featured

हल्ली

जीवघेणे कायदे झालेत हल्ली लोकशाही चालते झोपेत हल्ली गप्प का झालेत सारे बोलणारे? ओतते पाणी कुणी तोफेत हल्ली फाळणीचे ज्ञान आले पुस्तकांनी राम अल्ला भांडती शाळेत हल्ली पेटले आकाश माझे आसवांनी शोधतो मी चांदण्या राखेत हल्ली अंगणाशी ऐक टाहो सानुल्याचा घेतली तू नोकरी काखेत हल्ली वाटतो मज चेहरा तो ओळखीचा मी स्वतःला भेटतो वाटेत हल्ली काळरात्री संपण्याची वेळ येते तेवतो मी एक या आशेत हल्ली 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

Latest Posts

तरुण भारत कोल्हापूर: शहादा गझल बातमी

गुणदोष

*"निकालाचा निकाल"*

"वट पौर्णिमा"

"ट्रक्टर ड्रायव्हर"

क्रांती आणि क्रांतिकारक

विठू तुझे रूप ते सुंदर

गोड बोला