उन उबेल्या अंगाव
-इंदू
induji.in
एखादी सासुरवाशीण आपल्या सख्यापासून दूर आहे. तिचा राया काही कारणास्तव दूर देशी गेला आहे. अश्यातच वळीवाची सर टपटपुन अंगणात बरसू लागली. तापलेल्या वातावरणात थंड थेंबानी तिच्या विरह वेदना वाढविल्या आणि व्याकूळ सखी आपल्या मनातल्या भावना तिच्या ओठातून अलगद बाहेर पडतात आणि ती तशीच चिंब भिजत आपल्या रायला आवाहन करू लागते.
उन उबेल्या अंगावं, थंड थंड बाई थेंबे
मन मोहरुन गेले, अंग षहारुन आले
उन तापल्या उन्हाळी सरसरल्या गं सरी
नजरंपल्याडंचं ढग आलं आलं रानावरी
धरा लाजली सख्याला, रान बावरुन गेले
मन मोहरुन गेले, अंग षहारुन आले
काळवंडल्या हया दिषा, आसमंत निनादला
मोर लांडोऱ्यांनी कसा रानी गलबला केला
फुलविताना पिसारा, मोरपीस ओघाळले
मन मोहरुन गेले, अंग षहारुन आले
आता तुझीच रे राया, वाट बघते मी अषी
ये तू परतूनी आता, मन लागेना कषाषी
गोड आठवांचे पीस, मनावरुन फिराले
मन मोहरुन गेले, अंग षहारुन आले
🌷🌷 *🌷🌷
Comments
Post a Comment