*छाताडाच्या पिंजऱ्यात*

इंदू
fb.com/INDUJI.in

एका वृद्ध विधवेचे दुख: या कवितेतून थोडक्यात सांगतोय. तिचे आनंदाचे हसरे दिवस आणि आताचा नकोसा असलेला वर्तमान ती जगते. अबोल्याचे एकाकीपणाचे दुख: तिचे तिलाच माहित आहे...

छाताडाच्या पिंजऱ्यात
श्वास घाली येरझारा
उगा केला व्याप सारा
उगा वाढला पसारा

डोळे लुकलुक दिवे
काजळाचा ग किनारा
काळजाच्या वेदनानी
पाणावल्या कडसरा

गेला अजस्त्र अंबाडा
आणि माथीचा गजरा
माळ माळील्या हातांचा
गंध विरला साजरा

होता साजन साथीला
त्याचा सह तो हासरा
उसे भिजते भिजते
आठवच तो आसरा

पिले पाखरेच झाली
उडे झेपावी भरारा
गुज अस्पष्ट अंतरी
सांगे उसासा अंधारा

जिणे जगावे जगावे
जीव जाईना का बरा?
हुंदक्यांच्या घंटानादी
रोज एकाकी गाभारा

इंदू शिरगावकर
🌷🌷 ***🌷🌷

Comments

Popular Posts