बघ थोडी पिऊन

-इंदू
fb.com/INDUJI.in

पिणारे! मी बेवडे म्हणणार नाही. पिणारे पण जागृत पिणारे! त्यांची आसक्ती संपत नाही, पण न पिणाऱ्यांना ते एक चांगला सल्ला देणारे! त्यांची एक वेगळीच फिलोसॉफी असते. ते वेगळ्याच मातीचे आणि दगडाचे असतात. असो!

काही दिवसापूर्वी मी काही मित्रांसोबत एका ओल्या पार्टीला गेलो होतो. अनुभव? अरे देवा! ते सगळे खरंच सांगण्यापलीकडचे आहे. पार्टी संपवून परतताना या अनुभवावर एक कविता करतो म्हणून त्यांना मी वचन दिले होते. लगेच दुसऱ्या दिवशी मी हि कविता लिहिली होती. त्यांनाही याच निमित्ताने वाचायला देत आहे. त्यांच्या प्रतिक्रिया येतीलच. तुमच्याही येवु देत.

.............................................
बघ थोडी पिऊन मित्रा, हे जीवन झकास आहे
तत्वज्ञानाच्या ग्लासातच हा बुद्धीविकास आहे

जरी असलो मी हा असला
बहु लुकडा हलका फुलका
बाह्यांगी मूषक इवला
अंतरात वाघच झुलता
बरळत्या डरकाळीविन रे हे आरव भकास आहे
बघ थोडी पिऊन  मित्रा, हे जीवन झकास आहे

ले शूर वीर तो संचार
जगताशी लावूनी अश्वे
स्वत्वाची थोर जाणीव
कस मुठीत अठरा विश्वे
नच चिखल ते सिंहासन, ना अंत या सुखास आहे
बघ थोडी पिऊन  मित्रा, हे जीवन झकास आहे

कधी कधीच ये ते वमन
वादळेच ढवळूनी कोष्ठी 
कैक ठायी आम्ल कहाण्या
अन कैक सांगाव्या गोष्टी
लहरून अंग प्रत्यंगी रे नशा या कचास आहे
बघ थोडी पिऊन  मित्रा, हे जीवन झकास आहे

अवहेलना खूप सोसली
मुले भार्या सोडून गेली
श्वास सरते कंठून थोडे
ती जीवाशा सडून गेली
यातना जन्म मृत्युच्या, काळोखा प्रकाश आहे

नको पिऊ विष हे मित्रा, जीवन खरेच झकास आहे  

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

Comments

Popular Posts