आकाश पेलले मी
-इंदू
fb.com/INDUJI.in
माणसाचा जन्म हा सुख-दुखाचा खेळ आहे. कितीही मनाप्रमाणे व्हावे असे वाटले तरी, सगळे मनासारखे होईलच असे नाही. जेंव्हा मनाप्रमाणे होत नाही, बिनसतं, दुखतं, वाईट वाटतं आणि मग आसवांच्याही थोडीशी आधी एक कविता सुचून जाते. हि कविता, कणखर मनावर उठलेला दुखरा वळ असतो. जोवर हा वळ मनावर राहतो, तोवर दुख संपत नाही. आणि काही दुखणी, संपू नयेत अशीही असतात. ती दुखनीच कधी कधी जीवनाची सोबत असतात. कारण, माझ्यासारख्याच्या आयुष्यात फक्त तीच उरलेली असतात.
सोसली कैक वादळे, पदरी, अंगार झेलले मी
खांदे अभंग माझे, त्यावरी, आकाश पेलले मी
कुटी सजवून काटक्यांची, केला महाल लखाकी
बीज प्रकाशी रंगाचे, इवल्या, परसात पेरले मी
जोडून ओंजळी करांच्या, झोळी बेरंग झालरींची
नक्षी विभोर कसली, सुखास, ठिगळात देखले मी
दुखण्यास वेड माझ्या, हसणेच गोड त्याचे
कळ लकेर येत जो, आणिकी, हलकेच खेचले मी
विखरून श्वास माझे ऊर्ध्व शुभ्र अभ्रकी त्या
एकेक थेंब उसासे, हृदयी, हळुवार वेचले मी
अवकाश स्वल्पसा का, का भेट ती क्षणांची
जीतवून खेळ सारे, तुजला, हरण्यात हेरले मी
🌷🌷 *🌷🌷

Comments
Post a Comment