"ट्रक्टर ड्रायव्हर"
"ट्रक्टर ड्रायव्हर"
राजा हिंदुस्तानी आणि अल्ताफ राजा नसते तर ट्रक्टर ड्रायव्हर ही जमात अस्तित्वाच उरली नसती... एकवेळ डीजेल नसले तरी चालेल... पण मोठ्या आवाजात हि गाणी लावलायलाच लागतात.
मागेतर, एका पट्ठ्याने दोन एकराची नांगरट विनाडीजेलची केवळ "परदेशी परदेशी ज्याना न्हयी" या गाण्यावर केली. विशेष म्हणजे ट्रक्टरच्याही, आपलं डीजेल संपलंय, हे लक्षात आलं नाही. त्यामुळे त्यानेही "ज्याना न्हयी ... ज्यान्ना न्हयी" च्या लयीत ती नांगरट मजेमजेत संपवली होती.
उसाच्या हंगामात तर, रस्तेच्या रस्ते, दिनरात आणखी काही दोन चार गायन प्रकार सोबतीला घेऊन दुमदुमत असतात. दोन बाजूचे दोन डमरू लावले की या ड्रायव्हर लोकांना स्वर्गलोकीच्या सर्व सुखाची चेतना संचारून जाते.
रिकामे ट्रक्टर तर हे असे चालवतात, की मायकल शुमाकरने सुद्धा यांच्याकडून फोर्मुला वन चे धडे घ्यावेत...
बहुत सांगणे नाही.. पण भावांनो... सकाळी सकाळी... "मय यऽऽऽऽऽ न्हयी कह्यऽऽतीऽऽऽऽऽऽ..." नका लावू...
दिवसभर डोक्याचा इला अरुण होऊन जातो....

Comments
Post a Comment