*"निकालाचा निकाल"*

        *"निकालाचा निकाल"*

१० वीचे निकाल लागले आणि का कुणासा ठाऊक मला उगाचच inferiority complex झाल्यासारखे वाटू लागले. सगळ्या whatsapp ग्रुप मधून धडाधड कुणाची न कुणाची तरी पोरगा किंवा पोरगी ९० - ९५ आणि कुणाकुणाची तर चक्क ९९.९९ टक्क्यापर्यंत धडक मारून आल्याचे मेसेज वर मेसेज येत होते.

या सर्व शुभेच्छांच्या सुकाळात माझ्या शेजापाजाराचे, गल्लीतील किंवा पैपाहुण्यातील कुणीच नसावे याचे राहून राहून अतीव दुःख कालचा पूर्ण दिवस मला खात राहिले.

असो, पण मला एक प्रश्न मात्र पडत राहिला, तो म्हणजे, हल्लीची पोरं हुश्शार झालेत की मास्तर आणि बोर्ड 'ढ' झालेत?? बघा, म्हणजे खरेच विचार करण्यासारखी गोष्ट होऊन गेली राव!

आमच्या काळी ना whatsapp, ना फेसबुक, ना इतके टीव्ही channel ... तरीही घास घासून... घास घासून कशीतरी ५७-५८ पर्यंत मजल मारली. तरीही वर्गात दुसरा आलो. तर बोर्डात सुद्धा पहिला येणारा ८०-८५ चा होता. आणि आता इतके सगळे असताना... एवढेच काय परशाची आर्ची एकही दिवस शाळेला न जाता ६६ आणि वर point काय काय तरी मिळवली...

म्हणजे आम्ही वरीस वरीस भर घासून सुद्धा आमचा ए बी डिव्हीलीयर्स झाला आणि ती मात्र जाता जाता शिखर धवन झाली.

पण तरीही तिचे मार्क सुमारच म्हणायचे... कारण अजून ऐकायला मिळालेल्यापैकी कुणाचेही  मार्क तिच्यापेक्षा कमी नाहीत. अगदी पलीकडच्या गल्लीतल्या गण्याने सुद्धा पूर्व परीक्षेला सगळ्याच्या सगळ्या विषयात होलसेल नारळ आणूनसुद्धा गड्याने बोर्डाच्या परीक्षेत ७१% मिळविले.

त्याबद्दल, शंकर मामांनी काल रात्री मी अलीकडच्या गल्लीत राहत असूनसुद्धा 'खाराकांड्यांच्या' बेताला मला बोलावलाच.

नंतर माझ्या लक्षात आले की, शंकरमामाने एक प्रकारे माझ्या ५८% ची 'गणना' करण्याच्या हेतूनेच मला बोलावले होते आणि शिवाय आमच्या गल्लीकडे पुढा करून गण्याचे मार्कांसकट डिजिटल लावले होते.

असू दे... जाऊ दे...! शंकरमामांनी दिल्याली खाराकांड्याची पार्टी मात्र जंगी झाली होती. रस्सा तर एक नंबरच...!

*#कसंतरीच_व्हतंय*
-इंदू शिरगांवकर
        fb.me/INDUJI.in


〰➿〰➿〰➿〰➿〰➿〰➿〰➿〰➿

Comments

Popular Posts