तरुण भारत कोल्हापूर: शहादा गझल बातमी
कोल्हापूर / प्रतिनिधी
शहादा (जि नंदुरबार) येथे जायंट्स ग्रुप ऑफ शहादा तसेच शिरपूर जिल्हा धुळे येथे स्वर्गीय मुकेशभाई पटेल यांच्या स्मरणार्थ आर सी पटेल फार्मसी कॉलेज येथे आयोजित गझलनिष्ठ प्रतिष्ठान यांच्या गझल संमेलनात कोल्हापूरचे कवी गझलकार श्री इंदू शिरगांवकर यांनी आपल्या बहारदार सादरीकरणाने श्रोत्यांची मने जिंकली.
आपल्या भारदस्त आवाजाने आणि तितक्याच शब्दांनी इंदू शिरगांवकर यांनी दोन्ही ठिकाणची प्रास्ताविके केली तसेच आपल्या अफलातून सादरीकरणाने दोन्ही संमेलने अगदी जिंकली..त्यांच्या "आज आलो" या गझलेतील प्रचंड आशावादाने श्रोते बेहद खुश झाले.
या संमेलनात महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यातून गझलकार उपस्थित होते. रत्नाकर जोशी(परभणी), निशांत पवार आणि बापुजी दासरी (नांदेड), डॉ. शिवाजी काळे (अहमदनगर), नारायण सुरंदसे (अमरावती), अभिजित काळे (पुणे) या गझलकारानी आपल्या गझला सादर करुन रसिकांची मने जिंकली. केली. तसेच, या उद्घाटनाच्या सोहळ्यास भूषण अहिर, जावेद सय्यद, आत्तम गेंदे, राज रणधीर, नंदकिशोर आगळे इत्यादी गझलनिष्ठचे सदस्यही हजर होते. तसेच, ज्ञानेश्वर भामरे व शरद धनगर या स्थानिक साहित्यिकांनीही आपली उपस्थिती दर्शविली.
गझल क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल इंदूना विशेष सन्मानाने पुरस्कृत करण्यात आले. या वेळी सौ. सुनंदा पाटील (मुंबई) डॉ. शिवाजी काळे (अ.नगर) बबन चखाले (सासवड) आदींनाही या विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले
शहादा येथील गजल संमेलन प्रसिद्ध गझलकार श्री. नितीन देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली सुरू करण्यात आले. या संमेलनाचे सुंदर सूत्रसंचालन गोपाल मापारी यांनी केले. तर शिरपूर येथील गजल संमेलन प्रसिद्ध गझलकारा सौ. सुनंदा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सुरू करण्यात आले. या संमेलनाचे सूत्रसंचालन बापुजी दासरी यांनी केले.
शहादा येथील संमेलनास नंदुरबार जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तथा दंडाधिकारी मा. डॉ. श्री मल्लीनाथ कलशेट्टी, श्री बापुसाहेब दिपकभाई पाटील, मा. नगराध्यक्ष श्री मोतीलालजी तात्या, जायंटस चे अध्यक्ष श्री संजय छाजेडजी , सौ सुरेखा ताई छाजेड, श्री शरदभाई पाटील, मा प्रांतसाहेब, मा.तहसीलदार श्री दळवी साहेब, केदारेश्वर प्रतिष्ठानचे डॉ. प्रशांत पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
तसेच शिरपूर येथील कार्यक्रमास शिरपुरचे आमदार श्री काशीरामजी पावरा, शिरपुरच्या नगराध्यक्षा जयश्रीबेन पटेल, उपनगराध्यक्ष भूपुशभाई पटेल, माजी नगराध्यक्ष रावसाहेव प्रभाकरजी चव्हाण आदी मान्यवर हजार होते.
फोटो कॅप्शन: शहादा येथील गझल संमेलनात गझल सादर करताना इंदु शिरगावकर


Comments
Post a Comment